बुधवार, २४ जुलै, २०१३

1
एक सकाळ गर्द सावळी
तिची आठवण सावल्या आभाळी 
तिचा चेहरा सावळ्या सागरी 
हास्य तीच लहरीन्वरती
पाणी हिंदकळून माझ्यावरती  
ती हसतेय निर्मल शुभ्र 
वर दाटले सावळे अभ्र 
मी मध्ये उभा अवाक होऊन 
ती सागरात - आभाळात - हृदयात 
नेहमी हसरी कशी मृत्युच्याही दारात ?
मग? हाच आहे का तो क्षण 
मी हि मागावे हसरे मरण 
झोकून द्यावे तिच्या हास्यात 
मिसळून जावे सावळ्या रंगात 


2
chhe re ! aatat chalalet shabd
shavas hi purata stabdh 
tu vach aata mazya cheharyaavar
ek mrutyupatr


mazya syllabus madhe
kon hot kunas thauk 
pan result chya veli kalal 
tu syllabus madhe navhatasach
aani akhha paper mi 
tuzyavar sodavala......


3
ती 
माझ चिडणं- रागावणं - वैतागणं म्हणजे 
प्रेशर कुकर च्या शिट्ट्या झाल्या समज
आता आत सगळ शिजलंय व्यवस्थित 
आणि थोड्या वेळात सारे शांत 
चवीने खाऊ शकू अशा गोष्टी पानात होतील हजर
ढेकर दिलेली लोकच चवीने खातील 
'उपाशी ' बसेल पाहत वाट......
पुन्हा शिट्ट्या होण्याची 

तो 
तुझा रागही इतका व्यवस्थित कसा ?
कि शिजावे त्यात सगळे छान 
दिसावे सुंदर वाढलेले पान
पण सखे
होऊ दे एक दिवस सारे अस्ताव्यस्त 
वाटू दे भीती मलाही 
नाही तर सुधारेन कसा मी 
सारे माझे व्यवस्थित असताना ? 


4
तो :

म्हटलं तिला...
का पोखर्तेयस  माझ आयुष्य..
म्हणाली...
तुझ्या अंता पर्यंत पोहोचायचे
म्हटलं 
म्हणूनतर भारकटलीयस...
म्हणाली...
का?..का?..सगळे रस्ते चुकातायात ?
म्हटलं..
चुकायाचेच ..
माझाच शरीर मी केव्हाच सोडलाय....

एक साक्षी भाव :

तू एक अशरीरी आत्मा  की ब्रह्मसंबंध ?
की dragan की राक्षस ?
कोण कोणाचं पोखरतय आयुष्य ?
कोण घोटाळतय  स्वतःच्याच पावलात ?
का घातलय एक रिंगण स्वतः भोवती 
ती आणि तू अशरीरी दोघे 
व्यापा की सगळे ब्रह्मांड 
मग कसलं पोखरण ?
कसलं रस्ते चुकण ?
सारा आनंद .....
अशरीरी ....

तो :

gr8.....मला का नाही सुचले ?



एक साक्षी भाव :

आता सुचेल खूप बरेच काही ...इथून पुढे ....


तो :

बरेच काही ...इथून पुढे .... घडआयचे  कि घडवायचे? 
कदाचित बिघडवायचे...
नसेलही...
वाटते तिला अडवायचे..
असेलही...
तिच्या मनात विर्जायचे..
कोण अग्नी देणार आहे?
कृपया जरा पुढे या....


एक साक्षी भाव :

एवढेच कळले 
की भरकटला तो ....
एक पाऊल रिंगणाबाहेर
पडतापडता 
परत आत गेल......
अरे काळ का थिजवलायस ?
ती ही घुसमटतेय तुझ्यात ....
बाहेर पड तिच्यासह ...
मग बघ तुझा प्रवास किती आनंदाचा  होईल......



5
एक मूर्ख अधिक एक मूर्ख 
किती होतात 
.........दोन मूर्ख ?
..........एक मूर्ख एक हुशार ?
...........दोन हुश्शार 
.............?
एकच मूर्ख ........

एक मूर्ख वजा एक मूर्ख 
किती होतात ?
............अं...............?
....................शून्य?
एकच मूर्ख ...........

खरच तू मूर्ख आहेस 
कधी कळणार तुला ?



6
तुझा वेग अफाट जगण्याचा 
आणि मी थांबलेली तिथेच 
कुठल्यातरी वळणावर 
मागे बघशील
अशी आस मनी बाळगणारी 

तुझ म्हणन  
कि ...तुला यायचं असेल माझ्या बरोबर 
तर वेग वाढव तुझा 

वाढवला आहे मी वेग 
फिरतेय तुझ्याभोवती 

लोक म्हणताहेत
पहा 
केव्हडी हि वावटळ 


7
तो गेला उत्तर न देताच  ती उभी अचंबित  जायचेच होते  तर सांगूनही जाता आले असते  ---- अच्छा ...लक्षात आले तिच्या
डोळ्यात पाणी होते त्याच्या
----
पण कशाला हवे पाणी डोळ्यात
ती तर असणार कायम मनात
विरह कुठे असणार आहे
दुःखाचा काय संबंध आहे?
----
नाही कसल्याच आशा...ना अपेक्षा
केवळ आनंद तिच्या उरात आहे

--------------संगीता




8
तो :

पाउस नाही थांबणार तुझ्यासाठी ...

अश्रू लपवावेत त्याने कशासाठी ...

दुःख म्हणजे काय असते नाही कळणार तुला ..

एक एक थेंब पावसाचा ...

एक एक क्षण तिच्या आठवणींचा ..

मग का थांबेल पाऊस ...
.
पसर तुझी ओंजळ त्याच्या पुढे ....

एक थेंब साठवलास मनात तर .....

तर नशीब तुझ ...........

...................

...............

ती 

आठवण काय फक्त ४ महिनेच ?

त्यातही फक्त ४ दिवसच ?

बाकी दिवसाचं काय?

अश्रू आटलेत माझे 

नाही राहिले कौतुक आसवांचे 

बरी आहे कोरडी ठन्न मी

तळपत्या सूर्यात होरपळायला 

------------
जळून खाक होईन मी 

पोचेल माझी वाफ ढगात .....

पुढच्या मोसमात

बघ मग .......

झेपतंय का तुला?





9

(ती ....)
फाटतील पान
जळतील वह्या 
पण मनाच काही खर नाही 
किती ठेचा ..कोंडा ...मारा त्याला 
ते आपल अमरत्वाच  पट्टा घेऊन आलय 
ते आपल अजर अक्षय  आत्म्यासारखं ...
भोवतालच्या मायेन बरबटलेल .....
----------
(तो ....)
खरय मनाचं काही खर नाही 
विश्वासघातकी ..
दगाबाज ...पाजी ..
नालायक ...
हरामखोर...
माझ्या मरणानंतर तू बघच
मन खुशाल सोडून मला 
धावेल तुझ्याकडे ..... 



10
झाडाच्या हिरव्या चार फांद्या 
माझ्या दाराचं तोरण 
पूर्वेच्या सूर्याचे थोडे किरण 
आणि एक तुकडा आकाश 
मी दार उघड ठेऊ का?येणारेस का?
का ...आहेत सगळे आभास ?....

लगेच एक अंधारी 
सूर्यावर झाकोळलेला मेघ 
माझ्या मनाला आशेची रेघ 
तू कसा येणारेस ?..थेंबाथेम्बाने ..कि सरीसरीने..
 मी दार उघड ठेऊ का?येणारेस का?
कि मी भिरभिरतेय भ्रमाने?....

क्षणात एक सोनेरी झळाळी 
काळ्याशार मेघाच्या लखलखत्या भाळी 
तू हसतोयस ?
आणि घनघोर ओथंबलेला तू 
अडवातोयास का स्वतःला ?
वाराही नाही सोबत पुढे जायला 
मग काय हरकत आहे कोसळायला ?
 मी दार उघड ठेऊ का?येणारेस का?
कि मी माझ मन गोळा करायचं सावरायला ?....

आभासा पलीकडे ...
भ्रमाच्या पार 
सावरण्याच्या क्षणी 
तू का आलास झणी ?

थांब तू ...जा तिकडे 
मी दार लावून घेणार आहे 
घट्ट ..मिट्ट... काळोखाच.....
----------------


11
मन माझ फुलपाखरू 
नाचत ...डोलत ..
गिरक्या घेत ..
खाली पडत ...थकत ...
जीव त्याचा छोटासा 
एका दिवसापुरता 
दिव्यावर मारून उडी 
अस्तित्व संपण्यापुरता ...

मन माझ फिनिक्स 
उठत आगीच्या राखेतून 
सावरत स्वतःला 
घटत गोळा करत एकत्र 
आणि चालत राहत ...पुढच वळण येईतोवर 


12
मन माझ see-saw
क्षणात आनंदी 
तर क्षणात दुःखी ....

मन माझ jigsaw puzzle
कधी पूर्ण चित्राची सलग उकल 
तर कधी तुकडे तुकडे 
वाकडे तिकडे ....

मन माझ उन पाऊस
पण नाही तो खेळ श्रावणाचा 
त्यामुळे नाही त्यात इंद्रधनू 
आणि फुललेला पिसारा मोराचा ...

13
tu paus mhanun athavanit chimb
aani 
ticha athavancha pausahi zalay koradathann
ye ekada valavantat
kalel eka ashruchi kimmat tula
mag firshil mrugajalasarakha aaspas
pan thauk ahe tila....ha sara abhas



14
उसवता अपेक्षांचा धागा 
होतो मनाचा त्रागा
मग पुन्हा टाके आशेचे 
नवीन वस्त्र अपेक्षांचे .....

हेच तर चक्र बंधनाचे 
कुठे दार मुक्तीचे ?
जो आहे बंध ..तेच आहे दार
सोडून आशा अपेक्षा ..मोडावा सारा अहंकार 
तेव्हा भेटे आनंद 
मग त्याचा लागे छंद  |



15
paus baher padatoy
ki toch zalay paus?
man othambalay tyach
sar tyachya shabdanchi
bhijavatey tila nakhshikhant


16
कोरड आसमंत .पांढरया ढगांनी भरलेल
एक रितेपण अवेळी आलेलं 
एक उदासी विनाकारण वातावरणात 
सूर्य झाकोळलेला ...पाऊसही नाही 
अशा वातावरणात काय करायचं सुचतही नाही 

एक चीपचीप, एक त्रागा
विनाकारण वाटत राहत 
उसवतोय का धागा
विनाकारणच हुरहूर 
भविष्याची चिंता 
वर्तमान रुसलेल 
भूतकाळ पुसलेला 
अशा वेळी कस गोळा करायचं स्वतःला 



17
काही नवीन नाही , जुनेच आहे सारे
उत्पत्ती -स्थिती- लय  चक्रात बांधले पसारे 

law of conservation of energy...
energy never destroyed...never created
it converts into other form..

जगाच्या आदी पासून अंतापर्यंत उर्जा तीच 
मग , कसलं काय नवीन 
तेच ते दळण

पाणी - वीज -आग - उष्णता - वाफ - पाणी 

सृष्टीच्या चक्रात सारेच बांधलेले 
पण प्रत्येकाचा span वेगळा 
काळाची माप वेगळी ....

मग  म्हणायचं कशाला तरी "नवीन ",
नि कशाला तरी "जुनं" ...दुसर काय ?

                                                          
------sangeeta



18
वाफाळलेला चहाचा कप... 
थोडा जपून पी बर....
नाहीतर भाजतील ओठ ...
हिंदकळेल कप ...
पडेल थेंब शर्टावर ...
आणि मग 
आणखी एक जखम 
हळव्या उरात 



19
paus teecha nirop gheun ala
salasaltya varyala
sobat gheun ala..
kanat olachimb kujabujala
an halakech hatavar
teeche ashru theun gela..

संपले आता विरहाचे क्षण 
येईन मी बघ लवकर 
निरोप तिच्या सजणाचा 
चिंब चिंब भिजवून गेला.....

20
हे देवा तू सगळ्यात मोठा क्रेडीटर

काहीच देत नाही आम्ही तुला

शेवटी आमची balancesheet  अशी ...

कि तू वरती तर आम्ही खालती 

पुन्हा  जन्म मरणाच्या फेऱ्यासाठी





तुझे बिल चुकते करायचे तरी कसे

कारण कमावतच नाही काही आम्ही 

ती bank तरी परवडली 

कधी ना कधी बुडीत खात्यात जमा करते आम्हाला 
तू मात्र दर वेळेला देतोस chance

आणि मग चौऱ्यानशि  लक्ष योनीचा मोठ्ठा फेरफटका




देवा एक काम कर 


पुढच्या वेळेस हात आवरता घे 

द्यायचच  असेल तर कमावण्याची अक्कल दे 
ताकदही दे निरन्तरतेची  

बस यार balancesheet  होऊ दे match

मुक्ती भले मला नाही , पण तू तर मिळव माझ्यापासुनची..
------------------------------------------------------------संगीता

शनिवार, ६ जुलै, २०१३

पावसाची रिपरिप

पावसाची रिपरिप 

बाहेर मिट्ट काळोख 

थेम्बानाहि समजेना
 
कुठे पडावं?

........

.....
विचारांची किरकिर

मेंदूला मुंग्या 

शब्दांनाही समजेना 

कुठे सांडावं ?

.......

भिजलेपण , चिखल सारा 

अंगाभोवती लपेटून 

थरथरती धरती 

वाट बघतेय 

एका प्रकाशाच्या तिरीपेची