1
मन माझ फुलपाखरू
आता कुठे प्रतिबिंब
ध्याता ध्येय ध्यानाची
त्रिपुटी एकसंध
---------------------संगीता
मन माझ फुलपाखरू
नाचत ...डोलत ..
गिरक्या घेत ..
खाली पडत ...थकत ...
जीव त्याचा छोटासा
एका दिवसापुरता
दिव्यावर मारून उडी
अस्तित्व संपण्यापुरता ...
मन माझ फिनिक्स
उठत आगीच्या राखेतून
सावरत स्वतःला
घटत गोळा करत एकत्र
आणि चालत राहत ...पुढच वळण येईतोवर
2
मन माझ see-saw
क्षणात आनंदी
तर क्षणात दुःखी ....
मन माझ jigsaw puzzle
कधी पूर्ण चित्राची सलग उकल
तर कधी तुकडे तुकडे
वाकडे तिकडे ....
मन माझ उन पाऊस
पण नाही तो खेळ श्रावणाचा
त्यामुळे नाही त्यात इंद्रधनू
आणि फुललेला पिसारा मोराचा ...
१
एक क्षण हसण्याचा
बाकी सारे रडण्याचे ...
एक क्षण सत्याचा
बाकी सारे आभासाचे ...
एक क्षण श्वासाचा
बाकी सारे निःश्वासाचे ..
एक क्षण धाडसाचा
बाकी सारे भयाचे ...
एक क्षण अद्वैताचा
एक क्षण हसण्याचा
बाकी सारे रडण्याचे ...
एक क्षण सत्याचा
बाकी सारे आभासाचे ...
एक क्षण श्वासाचा
बाकी सारे निःश्वासाचे ..
एक क्षण धाडसाचा
बाकी सारे भयाचे ...
एक क्षण अद्वैताचा
बाकी सारे द्वैताचे...
एक क्षण ऋताचा
बाकी सारे भ्रमाचे ....
असे असताना सांग बरे तू
कसे स्वतःला ओळखायचे ...?
--------------------------------------------------------
एक क्षण ऋताचा
बाकी सारे भ्रमाचे ....
असे असताना सांग बरे तू
कसे स्वतःला ओळखायचे ...?
------------------------------
२
तू दिलेल्या आरशात
लक्ख बघितलं स्वतःला
रापलेली मी
दुर्मुखलेली छाया
भयाचे कुलूप
साऱ्या तन मनाला
मग तुझा जप
तुझा ध्यास
तुझ्यासाठी चाललाय
आटापिटा खास
एका क्षणी डोक्यात उजेड
हा आटापिटा तुझ्यासाठी कुठेय
हा तर खरा माझ्यासाठी
दुसऱ्या क्षणी दुसरा उजेड
कुठे आहे तुझ माझ
आत बाहेर खरा तूच
आता कुठे आरसा
तू दिलेल्या आरशात
लक्ख बघितलं स्वतःला
रापलेली मी
दुर्मुखलेली छाया
भयाचे कुलूप
साऱ्या तन मनाला
मग तुझा जप
तुझा ध्यास
तुझ्यासाठी चाललाय
आटापिटा खास
एका क्षणी डोक्यात उजेड
हा आटापिटा तुझ्यासाठी कुठेय
हा तर खरा माझ्यासाठी
दुसऱ्या क्षणी दुसरा उजेड
कुठे आहे तुझ माझ
आत बाहेर खरा तूच
आता कुठे आरसा
आता कुठे प्रतिबिंब
ध्याता ध्येय ध्यानाची
त्रिपुटी एकसंध
---------------------संगीता
3
निःशब्द तुझ्या ओळींनी
9
बरेच काही सांगितले
प्रत्येक टिंबाटिंबातून
भावबिंदू ओघळले
ती अजिजी , ते आर्जव
ते लाघव ,ते मार्दव
ते उसासे, ते निश्वास
ओघळले आसपास
तुझ्या रित्या ओळी
तुझ्या शब्दांपेक्षा
जास्त व्यक्त करतात
आशा अपेक्षा
4
भ्रम आणि वास्तव यातला नक्की फरक काय ?
माणसासाठी दोन्ही अवस्था एकसारख्या दुसरे काय ?
वास्तवातील गोष्टींना तो खरे मनात नाही
भ्रमातील गोष्टींना उरातून बाहेर काढत नाही
सारा गोंधळ वास्तव भ्रमाचा उठतात वावटळी सततच्या
येता जाता गोंधळ सावरणार्या अवस्था सतत मनाच्या
5
आता कुठे जाता जाता
शेवटचे श्वास मोजतेय मी
आणि तुझे म्हणणे कि
सांगायचे राहिले तुला
थांब थोडी आता ...
राहिलंय सांगायचं कि
खूप प्रेम आहे माझ
तुझ्या सोसण्यावर
तुझ्या सांभाळण्यावर
तुझ्या माझ्या संसारावर
तुझ्या रागावण्यावर
तुझ्या त्राग्यावर
तुझ्या बटांवर
.......तुझ्यावर
तेव्हढ्यात ऐकू येते घरघर
राहते सारे मनात ...
आधीच सांगायला काय झाले होते
ऐकायसाठी श्वास अडकले होते ...
......पण चेहऱ्यावर तिच्या
पसरली आहे शांतता ....जाता जाता
6
एक विचित्र कंटाळा
उदासी वातावरणात
एक चीप्चीप
वार्यालाही हलावेसे वाटू नये !!
एका झुळूकेसाठी
तहानलेली मी
चातकासारखी बघतेय वाट
पावसाच्या थेंबाची ..........
आली पावसाची सर
मागून उनही नभभर
सावल्या मेघाला
लाभे तेजोमय आभा अधर
सरली उदासी ,सरला कंटाळा
मेघ कृष्णरूपी भासे या दृष्टीला
इंद्रधनू उमटे त्यावरी
जणू कृष्ण खोवे मोरपिसापरी ....
7
सकाळची घाई
कुकरची शिट्टी
भाजीची फोडणी
कणकेचा गोळा
मन झालाय तोळा.....
मनाला जीवनसत्व देणारे
कुकर , भाज्या , कणिक
कुठे मिळते देवा .....?
तो म्हणाला ....
क्षमाशिलतेत
8
बाहेर एक
उदासी छटा
आभाळाच्या भाळावर
झाडांच्या बटा.........
ती निष्पर्ण ...खोडासारखी
उभी आहे दारात
कधी यावा तिचा सावन
त्याची वाट पाहत....
अंधार होता क्षणभरात
कुठूनशी वीज एक चमकते
निष्पर्ण खोडाला
जणू पालवी फुटते ......
ठाऊक नव्हता तिला
हा इशारा होता जळण्याचा
उंबरठ्यावर ढीग आता
जळलेल्या राखेचा .........
आता हो कितीही निःशब्द
आणि कुढलास कितीही आत तरी
राखेतून ना उठणार
हि फिनिक्स आता कधीही
मरण जितक ग्रेट
तितक जीवन का नाही ?
.........
मरण सत्य
तर जीवन आभास
म्हणून मरण ग्रेट
तर जीवन एक त्रास
जीवन जगण्यापेक्षा
रोजच मरण बर
भ्रमात राहण्यापेक्षा
सत्यात राहाण खर
मिट्ट काळोखात
एक सळसळती लखलखावी वीज
बीजेची कोर कधी असावी आभाळाच्या भाळी
शुक्र तारा जसा रोज साथीला
मैत्री लाभावी अशी आयुष्याला
ध्रुव तारा जसा अटल आभाळात
मैत्री लाभावी तशी आयुष्यात
10
गर्द हिरव्या झाडीतून
मावळता सूर्य
लखलखीत केशरी
मी गेले त्याच्या
मागोमाग
वारा पीत पीत
पण गुडूप झाला
तो त्याच्या घरात
मी बसलेय अंगणात
त्याची वाट बघत
उद्यासाठी
11
कुणाकडे मागतोयस
चार ओळी उधार ?
जिच्याकडे
नाहीत भावना
नाहीत कल्पना
नाहीत शब्द
नाहीत अश्रु
आहे फक्त एक कलेवर
थांबलेल .....
कुणाकडून तरी
अग्नि घेण्यासाठी
12
तो:
पाऊस आहे का तिकडे
ती :
ढग आहेत गच्च भरलेले
सगळा "सावळा" गोंधळ
दिशांचे भान नाही
सारा सुन्न सन्नाटा
सारी चिक चिक
सारी पीर पीर
इतकही धुमसू नये
व्हावे मोकळे
तेव्हढाच एक श्वास
घेता येईल धरतीला .....
13
सूर्य लपला मेघाआड
पसरुनी किरणे बाहेर
सावळ्या मेघास लाभे
त्यांची सोनेरी किनार
सावळा मेघ असे हा
जणू कृष्ण माझा सखा
भोवतीची आभा त्याच्या
तीच त्याची सखी राधा
किरणांविना मेघ हा
निस्तेज बापुडा आहे
जैसे राधेविना कृष्ण
विरही व्यथा साहे
चैतन्य दोघांचे असे
त्या तेजोमय सूर्यापरी
मावळता सूर्यबिंब
उजळे पुनवेच्या चंद्रापरी
प्रेमाचे अपूर्व नाते
बंधही अति आगळे
दोघांचा आत्मा एक
शरीरी जरी वेगळे
-------------------
तुझ्याविना उभा जन्म माझा
नाही कळतील तुला यातना
14
एक तर यायचंच नाही
कि जीव नकोसा व्हावा
आलास तर इतका आसेसून
कि जीवच घेऊन जावास
किती नुकसान करोडोंच
किती लोक बेघर
पण हिशोब कुठून करणार तू
तुझ्या जीवाला नाहीच घरघर
तुला ठाऊक फक्त रपरप
सरसर सरसर सरसर
नाहीतर पुन्हा गुडूप होण
कि कास्तकारांनी आत्महत्या कराव्या भरभर
शेवटी काय तू ये कि नको येउस
जीव आमचा जाणारच
म्हणून तर मृत्यूचे नाव
पाऊस असे ठेवणारच
-------सौ. संगीता गजानन वायचाळ
कि जीव नकोसा व्हावा
आलास तर इतका आसेसून
कि जीवच घेऊन जावास
किती नुकसान करोडोंच
किती लोक बेघर
पण हिशोब कुठून करणार तू
तुझ्या जीवाला नाहीच घरघर
तुला ठाऊक फक्त रपरप
सरसर सरसर सरसर
नाहीतर पुन्हा गुडूप होण
कि कास्तकारांनी आत्महत्या कराव्या भरभर
शेवटी काय तू ये कि नको येउस
जीव आमचा जाणारच
म्हणून तर मृत्यूचे नाव
पाऊस असे ठेवणारच
-------सौ. संगीता गजानन वायचाळ
9423145126
15
manala mazya funkar nako
nako khule aasamant
nako mokala shvas
mhanun nako tuza sahvas
tu mhanaje ek tras aahes
maza adakalela shvas ahes
kiti ghenar ahes jeev ajun
kanthashi alela pran aahes
16
एक मस्त दुपार
आळसावलेली
आठवणींच्या परिघात
सुस्तावलेली
हळूच उठते ती
बनवते चहा
सख्याला तिच्या
आठवते पहा
चहाच्या कपात
आठवणींची गोडी
म्हणते प्यावी
थोडी थोडी
कट्ट्यावर मागवलेला
एक फुल दो कट
खड्यात गेली दुनिया
म्हणणारा तो नटखट
प्रत्यक्ष वेळ येता
जात पात मध्ये आणून
आईच्या नावावर
गेला निघून
चहाचा फुरका
ओठाला चटका
आठवणींचा झटका
नकोच हा
17
झाली तुझी जायची वेळ
संपला आजचा सर्व खेळ
मोज मग त्यातली पाच सहा नाणी
नको उगाच डोळा पाणी
घे त्यातली सगळी तुझ्याकडे
तुझ हसू फक्त ठेव माझ्याकडे
18
पाउस तिचा निरोप घेऊन आला
सळसळत्या वाऱ्याला
सोबत घेऊन आला
कानात ओलेचिंब कुजबुजला
अन हलकेच हातावर
तिचे अश्रू ठेवून गेला
संपले आता विरहाचे क्षण
येईन मी बघ लवकर
निरोप तिच्या सजणाचा
चिंब चिंब भिजवून गेला.....
आता येईल श्रावण मास
लपाछपी ऊन पाऊस
खेळामध्ये त्यांच्या दंग
होईल ती सजणासंग